व्हॅलेंटाईन डे (तीन पिढ्यांचा)

  • 8.1k
  • 2.9k

‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करावा की नाही याविषयी बरेच मतभेद आहेत. प्रेम हे अंतरात्म्यातून फुलणारी एक तरल भावना आहे. अशा प्रेमाला व्यक्त होण्यासाठी प्रदर्शनाची किंवा स्पेशल'डे'ची गरज काय ? शिवाय भारतीय संस्कृतीत इतके सणवार असताना अशा पाश्चात्य डे ची आवश्यकताच नाही असे विविध विचार प्रवाह आहेत. परंतु प्रेमाला फुलण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी जो द्यावा लागतो तो वेळ असायला हवा ना.... आजच्या फास्टफूडच्या जमान्यात जीवन इतके ह गतिमान झाले आहे की, ' लाजून हसणे ते अन हसून ते पहाणे ' अशा गोष्टींसाठी वेळच नाही. त्यामुळे एकमेकांना ओळखायला, प्रेम व्यक्त करायला असे व्हॅलेंटाईन डे चे निमित्त शोधले जाते. या निमित्ताने का होईना पण यंत्रमय