सुखी आयुष्याची व्याख्या...

  • 9.5k
  • 2.3k

अनु आणि तनु दोघी बालमैत्रिणी... तनुला लहान असल्यापासुन दागिन्यांची खूप आवड... तिला वाटे पैसा, दागिने असेल तर खर्या अर्था‌ने जीवन सुखी होते... अनु मात्र तिच्या उलट...तिला साधे राहणे जास्त आवडत असे....श्रीमंतीच्या मोहाला बळी पडून तनुने एका श्रीमंत पण कमी शिकलेल्या मुलाशी लग्न केले..... फक्त खूप दागिने मिळतील, छान-छान साड्या मिळतील म्हणून..ती खुश होती सुरवातीला... पण नंतर मात्र तिचा अपेक्षाभंग झाला... त्या घरात तिला काही किंमत नव्हती.. बारावी झाल्यावर हे स्थळ आले म्हणून लग्नाला तयार झाली ती.. तेव्हा अनुने तिला खूप समजावलं होते... विचार कर परत... नंतर पस्तावशील पण तनु मात्र त्या भौतिक सुखाच्या विचारात होती त्यामुळे ती कोणाचे काही ऐकत