जोडी तुझी माझी - भाग 42

  • 10k
  • 1
  • 5.5k

थोडावेळणी गौरवीच काही काम असत म्हणून ती विवेकच्या कॅबिनमध्ये येते.. तो ही काम करतच असतो..गौरवी - मी येऊ का ?? विवेक - हो ये ना.. आणि तू नाही विचारलं तरी चालेल.. गौरवी - ती आत येत.. थोडी अडचण होती विवेक, हा एक पॉईंट मला क्लिअर होत नाहीये, सृष्टीकडे गेले असते पण ती आज जर जास्त कामात आहे आणि सकाळपासून थोडी अपसेट पण.. म्हणून मग तुझ्याकडे आले..विवेक - ये ना बस.. ती विवेकच्या बाजूच्या खुर्चीत बसते.. आणि त्याच्या कडून पॉईंट क्लिअर करून घेते. काम झाल्यावर ती निघून जात असते.. विवेक तिला बघतच असतो ती काही बोलेल अस त्याला वाटत पण ती उठून जात असते..