जोडी तुझी माझी - भाग 43

(12)
  • 12.2k
  • 1
  • 5.2k

संध्याकाळी तिघे पण एक चांगल्या हॉटेल मध्ये जेवायला जातात.. ऑर्डर देतात.. ऑर्डर देताना विवेक सगळं गौरवी च्या आवडीचं मागवतो.. आणि सृष्टीला तिच्या आवडीचं मागावं बोलतो.. सृष्टीला आणखी एक प्रश्न पडतो विवेकला गौरवी च्या आवडीबद्दल कस माहिती? ...ऑर्डर यायला थोडा वेळ असतो .. सृष्टीचे सकाळचे सगळे प्रश्न अनुत्तरित असतात आणि आता हा आणखी एक नवा प्रश्न.. तिला त्याची उत्तर हवी असतात.. तर तीच सुरू करते बोलणं..सृष्टी - विवेक मला खूप प्रश्न पडले आहेत विचारू का??विवेक - विचार विचार..सृष्टी - चिढणार नाहीस नाविवेक - नाही ग चिढणार आणि हो सकाळसाठी i m really sorry .. सृष्टी - तुला गौरवीच्या आवडी निवडी इतक्या कश्या माहिती??