नवदुर्गा भाग १० - अंतिम भाग

  • 9.8k
  • 3.3k

नवदुर्गा भाग १० देवी महागौरीची उपासना केल्याने तुम्हाला अपेक्षित परिणामही मिळतात. देवीची उपासना केल्यास पापांचा अंत होतो,ज्याद्वारे मन आणि शरीर शुद्ध होते. अपवित्र आणि अनैतिक विचार देखील नष्ट होतात. देवी दुर्गाच्या या सौम्य स्वरूपाची उपासना केल्यास मनाची शुद्धता वाढते. ज्यामुळे सकारात्मक उर्जा देखील वाढते. ही मनाला एकाग्र करण्यास मदत करते. आयुर्वेदात अष्टम महागौरी म्हणून तुळशीचे नाव घेतले जाते . जिला प्रत्येक व्यक्ति औषधिच्या रुपात ओळखते . तुळस अशी वनस्पती आहे जी प्रत्येक घरात लावली जाते . तुळशीचे सात प्रकार असतात . सफेद तुळस, काली तुळस, मरुता, दवना, कुढेरक, अर्जक आणि षटपत्र या सर्व प्रकारची तुळस रक्त साफ करते