कादंबरी - प्रेमाची जादू - भाग - ३० वा

  • 9.7k
  • 3.8k

कादंबरी –प्रेमाची जादू भाग- ३० वा ------------------------------------------------------------------------------ १. चौधरीकाकांच्या घरी झालेली ती पार्टी ..यशला एक स्वप्न वाटत होते ..पंधरा दिवस होऊन गेले होते .. सगळ्यांच्या भेटीला ..पण त्याचे मन अजूनही हवेत तरंगल्यासारखे ,जणू जमिनीवर येण्यास तयार नव्हते . चौधरीकाकांनी ..हे सगळे करणे “ हे उगीच्या उगीच नाहीये “,अशी शंका यशच्या मनात सारखी येत होती . .कारण .. आपल्या घरातील सगळेजण , आपली मित्रमंडळी ,एकाचवेळी एकत्र येणे , सगळ्यांच्या जेवणाचा खटाटोप ,त्या नंतरची ..गाण्याची मैफिल .. या सगळ्याच्या उद्देश ..मधुरा ‘सगळ्यांच्या समोर यावी हाच होता का . ? आजी-आजोबांना तर मधुरा कशी आहे ? हे नव्याने सांगावे असे काही नव्हते