राजकुमार समतल जादूगारा च्या गुहे जवळ येऊन पोहचतो व साधू महाराज नी दिलेली पाणी अंगावर शिंपडतो त्या जादुई पाण्यामुळे तो सहज गुहेच्या आत मध्ये प्रवेश करतो ..आणि समोर च दृश्य पाहून चकित होतो..कोणाला ही वाटणार नाही ..की या गुहे पलीकडे एक सुंदर राजवाडा आहे ..त्या राजवाडया समोर एक सुंदर शी बाग ..नकळत राजकुमाराचे पाय त्या बागेच्या दिशेने वळतात..अनेक सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुले त्या बागेत होती.त्या फुलांवर उडणारी इतकी सुंदर फुलपाखरे त्याने कधीच पहिली नव्हती.. निळी ,पिवळी,सोनेरी रंगाची..एका पेक्षा एक सुंदर..हिरवीगार झाडे..त्यावर ..वेगवेगळे पक्षी..फुलांनी फळा नी बहरलेली बाग .. निळे पांढरे मोर ते ही एकत्र नाचताना पाहून तर राजकुमाराचे भान