'दार उघड बये दार उघड!!' "शमी, तो टीव्हीचा आवाज कमी कर आधी.", अरुण पेपर वाचता वाचता ओरडत म्हणाला. "काय त्या आदेश बांदेकरने बायकांना पैठणीची स्वप्न दाखविली आहे देव जाणे. जिला-तिला होम मिनिस्टरमध्ये जायचय म्हणे" अरुणचे बोलणे सुरूच होते. इतक्यात स्वयंपाक घरातून शमी बाहेर आली आणि म्हणाली, "काय वाईट आहे त्यात. पैठणी जिंकणे हा एक निव्वळ खेळ नाही तो मान आहे आमचा. आदेश भावोजी तो मान आम्हाला घराघरात जाऊन देत आहेत" "आणि काय हो, तुम्हाला का इतकी चीड त्यांची. मी फोन करते म्हटलं तर तुम्हाला लगेच महत्वाचं काम येतं ऑफिस मधून. नाही त्या वेळेला असेच पडून असता घरी." "बस कर हा