अष्मांड - भाग १

  • 8.9k
  • 3.9k

मध्यरात्र उलटून गेली तरी शंकर अजून झोपला नव्हता. खाटेवर उताणा पडून आकाशाकडे एकटक पाहत तो आपल्याच विचारात गुंग होता. आकाशात सर्वत्र पौर्णिमेचे चांदणं विखुरलेलं होतं. वाऱ्याची एक मंद झुळूक वातावरण उल्हसीत करत होती. प्रत्येक झुळूक हवेतला गारवा आणखीनच वाढवत होती. नेहमी उकाड्याने हैराण करणारी रात्र आज मात्र मनमोहक सौंदर्याने नटली होती. पण शंकर ते सौंदर्य अनुभवण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. किंबहुना वातावरणातला बदल त्याच्या लक्षातसुद्धा आला नव्हता. आजूबाजूचा परिसर त्या मनमोहक गारव्यात चिंब न्हात असताना शंकरच्या डोक्यात मात्र विचारांचा भडका उडाला होता.