आज शृंगार खूप रागातच घरी आली. तिला पाहून तिच्या आईला आणि बाबांना पण कळून चुकले की नक्कीच हिचे काहीतरी बिनसले आहे. ती आज काहीही न खाता तशीच झोपायला निघून गेली. आईने किती फोर्स केला तरी काही खाल्ली नाही की काही बोलली नाही. आज तिला झोपच लागत नव्हती. राहून राहून त्याचाच चेहरा डोळ्यांसमोर येत होता. मागचा काळ अस डोळ्यांसमोर पुन्हा उभा राहत होता. का मी त्याचा विचार करत आहे. नाही नाही. मला नाही विचार करायचा त्याचा. अस म्हणत आपसूकच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले.तिला आजचा दिवस आठवत होता.सर, मी काय म्हणते, तुम्हीच अगोदर सामोरे जा ना त्यांना. मिस शृंगार तुला कोणी विचारलं नाहीये