कादंबरी - प्रेमाची जादू भाग-३२ वा.

  • 8.5k
  • 1
  • 3.5k

कादंबरी – प्रेमाची जादू भाग – ३२ वा -------------------------------------------------------------------- सकाळी सकाळी हॉलमध्ये चहा-आणि नाश्त्यासाठी नेहमीप्रमाणे यशच्या घरातील सगळे मेम्बर आलेले होते . नेमका यशच उशिरा आला आणि सगळ्यांना गुड मोर्निंग करीत खुर्चीत बसत म्हणाला .. " आज काय विशेष आहे बुवा ? सगळे कुठे बाहेर जाण्याच्या तयारीत असल्या सारखे दिसत आहेत . मला नाही सांगितले कुणी ? की आज काय शेड्युल आहे आपले ? आज्जी त्याच्याकडे पाहत म्हणाली – तुझे लक्ष तरी असते का आजकाल घरात ? ते असते तर आले असते लक्षात . चौधरीकाकांच्या घरी पार्टी झाल्यापासून तू आमच्या पासून जरा दूर दूरच राहतोय असे वाटते आहे आम्हाला ,