शेवटचा क्षण - भाग 2

  • 12.7k
  • 7.1k

शुभमंगल सावधान, सावधान, सावधान!! " करत लग्नाची मंगलाष्टके संपलीत.. आणि मंडपातील एकेक जण आता जेवणाकडे धावू लागलं, कुणाला लवकर जायची घाई होती तर कुणाला भूक अनावर झाली होती.. ही चांडाळ चौकडी मात्र तशीच मजा करत मंडपातच बसली होती.. आणि आईचा आणि बाबाचा ग्रुप ही तसाच या मुलांसारखा एकत्र अगदी मजेत वेळ घालवत होते...मध्ये मध्ये प्रतीक उठून काहीतरी आणायला जात होता किंवा तस दाखवत होता, तर कधी विवेकला मदत करायच्या बहाण्याने जात होता.. आणि तिकडूनच खांबाच्या आडून चोरून लपून तो डोळेभरून गार्गीला बघून घेत होता.. कारण गार्गी त्याचही पहिलच एकमेव प्रेम होती... तो आजही तिच्यावर तेवढच प्रेम करत होता जेवढं आधी