शेवटचा क्षण - भाग 5

  • 12.4k
  • 5.5k

साक्षगंध झालं आणि त्वरीतच लग्न मुहूर्त बघण्यात आला.. सगळ्यांच्या सोयीनुसार काढताना तो मुहूर्त चक्क 10 महिन्यानंतरचा निघाला.. गार्गी खुश होती उशीराच मुहूर्त निघाला म्हणून.. कारण आता तिला जून सगळं विसरून नव्याने गुंतायचे होते.. आणि यासाठी तिला वेळ हवाच होता.. तसा तो मिळाला..गार्गी कुण्या दुसऱ्याची होणार आता कायमची हा विचार करून प्रतीक मात्र पूर्ण बिथरून गेला पण सगळ्यांसमोर तस काहीच न दाखवता स्वतःला कसंबसं सावरत तो त्याच्या खोलीत गेला, आतून कडी लावून घेतली आणि रात्रभर ढसाढसा रडला.. आज तिच्या सर्व आठवणी त्याला छळत होत्या.. पण हे त्यानीच घेतलेलं पाऊल होतं.. त्यानेच तिला स्वतःपासून लांब केलं होतं.. ती दुसऱ्या कुणाची होताना त्याला