कादंबरी - प्रेमाची जादू भाग- ३३ वा

  • 10k
  • 1
  • 3.3k

कादंबरी -प्रेमाची जादू भाग – ३३ वा ------------------------------------------------------------- सकाळी सकाळी येऊन गेलेल्या दोन मोठ्या सेठलोकांनी यशने काही तरी केले पाहिजे अस बोलून दाखवले , तसे तर यश कुणालाही मदत करण्यास तयार असतो हे त्या सेठलोकांना माहिती होते . पण , यावेळी त्याला त्याच्याकडे नोकरीस असणार्या नारायणकांना मदत करायची होती . त्यात ही गोष्ट साधी सुधी नव्हती त्यात लपलेल्या अनेक गोष्टी होत्या , त्या उघडकीस आल्या तर ..त्रास होणार ..! या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते . काकांच्या जावयाने करून ठेवलेल्या पैश्याच्या भानगडी ऐकून ..यशचा मूड पार बिघडून गेला . काय करावे ? काही सुचेना , शांतपणाने आणि विचारपूर्वक यातून