सौंदर्य

  • 11.3k
  • 3.3k

आजची पार्टी खासच झाली म्हणायची आणि सक्सेसही. सगळ्या पार्टीचं आकर्षण मीच तर होते. ज्या उद्देशाने पार्टी ठेवली होती तो उद्देश सक्सेस झाला की किती बरं वाटतं जीवाला.पार्टीतले सगळे लोक माझ्याकडेच तर बघत होते अगदी पार्टी संपेपर्यंत. काहीजण तर मुद्दाम येऊन सेकहॅडही करत होते.त्यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयीच आकर्षण दिसत होतं.चाळीसी ओलांडलेली असूनही आपल्या सौंदर्याने लोकांना झुलवत ठेवण्यात औरच मजा असते,एक वेगळीच नशा असते. किती मूर्ख असतात नाही लोक एखादी सुंदर स्त्री दिसली की लगेच तडफडतात तिला भेटायला.म्हणूनच तर सेकहॅड करताना त्यांच्या नजरा माझा चेहराच न्याहाळत होत्या आणि काही जणांनी तर किती स्तुती केली माझी.काहिजनांनकडे तर माझ्या सौंदर्याचे वर्णन करायला