शेवटचा क्षण - भाग 9

  • 9.5k
  • 1
  • 4.4k

रात्री तिची जायची वेळ झाली पण गौरव मात्र अजूनही रुसलाच होता.. तिला त्याचा रुसवा कळत होता, पण मनवता आलं नाही.. सगळं आवरून दोघेही स्टेशन कडे निघाले.. तो तिला सोडायला जात होता.. जस जशी गाडीची वेळ जवळ येत होती गौरवची हुरहूर आणखी वाढत होती.. शेवटी त्याने आपला रुसवा सोडला आणि गार्गी सोबत बोलायला लागला.. त्याला वाटलं 'जेवढा वेळ आहे तो तरी निदान आनंदाने सोबत घालवावा आणि मी तिला अस रुसून बाय केलं तर तिला पण वाईट वाटेल' म्हणून तो शांत झाला आणि तिच्याशी बोलू लागला.. गौरव - गार्गी, नीट सांभाळून जा.. मला फोन करत राहा.. आणि पोचली की पण लगेच सांग, मी