शेवटचा क्षण - भाग 12

  • 8.7k
  • 2
  • 4.5k

आज गौरवचा वाढदिवस होता.... आज गार्गी सकाळपासूनच सगळं भराभर आवरत होती.. सुटीचा दिवस नसल्यामुळे नाईलाजाने गौरवला ऑफिसला जावंच लागणार होतं आणि तीच गार्गीला संधी मिळाली.. तिने वाढदिवसाच्या सजावटीच सगळं सामान आदल्यादिवशीच जाऊन आणलं होतं पण गौरवला काही कळू नये म्हणून मेघाकडे( तिची शेजारी मैत्रीण) कडे ठेवलं होतं.. तो ऑफिसला निघाला, जाताना त्याला फक्त कोरडं वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तिने रवाना केलं, लग्नानंतरचा माझा पहिला वाढदिवस असूनही गार्गीने मला साधं औक्षवन सुद्धा केलं नाही.. म्हणून त्याला थोडं वाईट वाटलं पण लगेच " ठीक आहे .. सगळ्यांना अस सगळं नाही सुचत निदान wish तर केलं ना विसरली तर नाही एवढंच पुरेसे आहे, संध्याकाळी