निर्मात्याचे मानवाशी संवाद

  • 12.5k
  • 1
  • 2.8k

निर्मात्याचे मानवाशी संवाद१)हे मानव तू स्वतःला कधी ओळ्खशील? आयुष्याच्या आतापर्यंतचा प्रवास जरी खडतर असला तरी तू यांवर अतिशय धैर्याने व खंबीर पणे मात केलास, आयुष्याच्या प्रत्येक स्पर्धेत आतापर्यंत तू जिंकत आलेला आहेस. याबाबतीत मी तुझे कौतुक करतो. तुझा सामर्थ्यांची व क्षमतेची जाणीव मला आहे व तुलापण याची पूर्ण जाण आहे. फक्त तू स्वतःला ओळखणे विसरून गेलास. हे तुझी किती मोठी चूक आहे, हे तुला कधी लक्षात येईल मानवा. तुझी परिस्थीती आता असं का होते 'कळते पण वळत नाही' हे पाहून मला खूप दुःख होतंय रे. एवढी प्रचंड क्षमता तुझी असताना देखील का जीवनात पराभव मानून मागे हटत आहेस.