घोडपदेवची माणसं

  • 5.4k
  • 1.5k

घोडपदेव मधील अनेक बोळ वजा गल्ल्या आणि आडव्या उभ्या चाळी. पूर्वेला घोडपदेव मंदिर तर पश्चिमेला मारुती, दक्षिणेला बजरंगबली तर उत्तरेला शिवशंभो संरक्षक म्हणून स्थानापन्न आहेत आणि यामध्ये आपले जागृत देवस्थान श्रीकापरीबाबाचे मंदिर होय. सभोवताली काही अभूतपूर्व वाणाची माणसे राहतात. सर्वजाती जमाती आहेच शिवाय पुणेरी, सातारी, कोल्हापुरी, कोकणी आदि सर्वच जिल्ह्यातील ही म्हटली तर देवमाणसे आहेत, नाहीतर सिधी-साधी महापुरुष वजा अगडपगड माणसे. विश्वात्म्याने ही माणसे घडवताना एक वेगळीच आगळ्या धाटणीची मूस वापरलेली असणार, त्यामुळे त्यांची जडणघडण जगावेगळी अगम्य आहे. या माणसात लसणाची किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा, पोळा उसळ, सपक सांबार किंवा झणझणीत कालवण, कडू बाजरीच्या किंवा गोड ज्वारीच्या भाकरी, नाक्यावरची तिखट