तू_ही_रे_माझा_मितवा... - 7

  • 12.6k
  • 1
  • 6.7k

#भाग_७“खडूस!! नेहमीप्रमाणे लव्ह यु सोडून सगळं बोलला. जा! मी ही बोलणार नाही,पाहू कुणाचा नाईलाज होतो न कोण अगोदर बोलतं ते, हिशोब मांडूया म्हणे.खडूसेस्ट व्यक्ती.” नाकावरचा लटका राग सांभाळत ती उठली आणि गाडीकडे निघाली.गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. ऋतू वेद्च्या समांतर बाजूच्या खिडकीजवळ होती.वेद्शी नजरा नजर होणार नाही याची मुद्दाम काळजी घेत ती हेडफोन कानात टाकून बाहेर बघत होती.जरावेळाने तिने डोळे मिटले. मिटलेल्या पापण्यांच्या आड सुद्धा वेद होता! एक गोड हसू ओठांवर तरळलं.धबधब्याजवळचे ते अलवार क्षण, चंद्राच्या,समुद्राच्या गप्पात भिजलेले क्षण आणि डोळ्यांवर हळुवार टेकलेले त्याचे ओठ,हे सगळं एखाद्या गोड स्वप्नासारखं मनात विरघळत होतं.”हे दोन दिवस कुठेतरी लपवून,ठेवावे अगदी त्या खडूसपासून सुद्धा!”स्वतःला बजावत होती.विचारांच्या