शेवटचा क्षण - भाग 14

  • 9.7k
  • 1
  • 4.9k

गार्गी - माझा साखरपुडा झाला ते तुला सहन झालं नव्हतं ना??यावर प्रतीकच उत्तर..प्रतीक - हो हेच कारण आहे गार्गी... मी तुला स्वतःहून माझ्यापासून लांब जायला भाग पाडलं त्याला ही कारण होतं.. तू किती मला पुन्हा आपल्या प्रेमाची जाणीव करुन द्यायचा प्रयत्न करत होती ते मला कळत होतं ग पण मी मुद्दामच तुझ्याशी अस वागत राहिलो.. कारण तूला वाटावं की आता माझं तुझं प्रेमाच नात संपलं.. आणि मग तू मला सोडून तुझ्या लायकीच्या मुलाशी लग्न करायला तयार होशील.. तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी तू गौरवला अंगठी घातली नंतर तुम्ही एकांतात बोलत होतात नंतर तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघाला या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला कुठेतरी खूप