शेवटचा क्षण - भाग 20

  • 8.6k
  • 2
  • 4.1k

एकदा निशा ताईची मैत्रीण रेणुका ताई बद्दल प्रतिकला कळलं.. रेणुका ताईने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केलं.. रेणुका ताईला प्रतीक आणि गार्गी सुद्धा ओळखत होते.. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसला.. पण घरच्यांनी नकार दिल्यामुळे तिने अस केलं होतं.. कारण मुलाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती , जात हे सगळं रेणुका ताईच्या घराशी जुळणारं नव्हतं... म्हणून घरच्यांचा नकार होता.. पण रेणुका ताईच्या अशा वागण्यामुळे प्रतिकला त्याच्या घरच्यांची मतं समजली.. ते ही किती कट्टर जातीवादी आहेत हे तेव्हा त्याला त्यांच्या रेणुका ताईबद्दलच्या बोलण्यातून जाणवलं .. त्याच्या डोक्यात नकळत त्याचा आणि गार्गीच विचार आला..आणि त्याच्या मनात एकदम भीती दाटून आली.. 'अजून बराच वेळ आहे