शेवटचा क्षण - भाग 24

  • 6.7k
  • 1
  • 3.3k

गार्गीने जेवण केलेलं नव्हतं म्हणून गौरवाने स्वतःच तिला भरवलं.. थोडावेळ tv बघून दोघेही झोपी गेले आज गार्गीला खूप मोकळं वाटत होतं त्यामुळे गौरवच्या कुशीत तीला लगेच शांत झोप लागली पण आज गौरव मात्र जागी होता..त्याला प्रतीकच बोलणं आठवत होतं.. आज तो गार्गीला न सांगता ऑफीसमधून लवकर निघून परस्पर प्रतिकला भेटायला गेला होता.. त्याच्या मनातल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि आणखी काही प्रश्न त्याला प्रत्यक्षात विचारण्यासाठी..लग्नात ओळख झालीच होती प्रतिकची आणि गौरवची तशी.. ते दोघेही एका हॉटेलमध्ये कॉफी प्यायला भेटले.. गौरवने गार्गीबद्दल महत्वाचं बोलायचं आहे असं म्हंटल्यामुळे प्रतीक सगळं सोडून आधीच दिलेल्या पत्त्यावर येऊन गौरवची वाट बघत होता.. 5 मिनिटं झाले असतील तेवढ्यात