अष्मांड - भाग ५

  • 6.9k
  • 2.4k

रात्री ते चौघेजण नावेतून बेटावर पोहोचले. झपाझपा पावले टाकत त्यांनी मंदिर गाठले. आणि कुदळ फावड्याने आसपासची जमीन उकरू लागले. बराच वेळ उकरल्यानंतरही खजिन्याचा काहीच मागमूस दिसेना. "सोनं सापडलं ही गोष्ट तर खरी आहे मग खजिनाही असलाच पाहिजे...... पण त्याचं दार कुठं असल ?" याच विचारांनी त्यांनी एकूण एक ठिकाणी उकरून पहिले. अगदी मंदिराची भिंतही फोडून टाकली. शेवटी एकाने शक्कल लढवली. 'कदाचित मूर्तीच्या चौथऱ्याखाली खजिन्याचं गुप्त दार असावं'. मग काय? दणादण घनाच्या घावाखाली मूर्तीच्या ठिकऱ्या उडू लागल्या. ती शेकडो वर्षे जुनी ऐतिहासिक मूर्ती फोडताना त्यांना काहीच वाटत नव्हते. सोन्याची चमक त्यांच्या डोळ्यात बसली होती आणि तिने