तू_ही_रे_माझा_मितवा... - 8

  • 14.6k
  • 5
  • 7.2k

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_८“ऋत्या हे स्वतःवर उपकार केल्यासारखं काय एवढंस जेवलीस गं आणि हजारवेळा फोन चेक केलास तरी काही बदल होणार नाहीये आता, तो तुझा मेसेज ही वाचणार नाही की स्वतःहून तुला फोन करणार नाही,त्यापेक्षा तू झोप बरं!” प्रिया ऋतूची अस्वस्थता जाणून होती.“प्रियु अजूनही फोन बंद येतोय गं,खूप काळजी वाटतेय.” रडवेली होत ती म्हणाली.“नको काळजी करू उद्या त्याला सरळ सॉरी म्हण आणि काही प्लॅन नको करायला आता, वाट पाहूया,तो जेव्हा बोलेले तेव्हा.” तनुसुद्धा तिला सल्ला देऊन आपण चूक केली ह्या विचारात होती.“झोपा तुम्ही दोघीही,मी जरावेळ गॅलरीत बसते,बघते फोन लागतो का ते.”ऋतू तिच्या आवडत्या खुर्चीवर विसावली.समोर वाऱ्याने हळुवार हलणाऱ्या गुलबक्षीच्या फुलांकडे बघून तिच्या डोळ्यात