लक्ष्मीचे रुप..??? फक्त नावापुरतेच नाही ना???

  • 10.1k
  • 1
  • 3.3k

आजच माझं लग्न झालं... नुकतीच माप ओलांडून मी माझ्या सासरच्या घरात लक्ष्मीच्या रुपाने आली. माझ्या मनात धडधड सुरुच होती. आजुबाजुला असलेली, नजरेसमोर येणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी नविन होती. माझं माहेर माझ्या सासरहून ४०० किमी दूर होते. म्हणुन माझं सासरच्या मंडळींसोबत कधीच बोलणं किंवा भेटणं ही झालं नव्हतं. माझी लास्ट ईअरची परिक्षा झाली आणि लगेचच मावशीने या स्थळाबद्दल वडिलांना सांगितले, बाबांनी कोणताही विचार न करता बघण्याचा कार्यक्रम ठेवला. दोन दिवसांनी येऊन मुलगा, त्याचे आई - वडिल आणि आत्या मला बघुन गेले. त्यांनी जास्त वेळ न घेताच अर्ध्या वाटेत गेल्यानंतर आम्हांला मुलगी पसंद आहे म्हणून फोन केला.. घरात सर्वच खुश होते. बाबांनी