तू_ही_रे_माझा_मितवा... - 10

(12)
  • 10.8k
  • 2
  • 5k

#तू_ही_रे_माझा_मितवा...????#भाग_१०“वेद,तू असाच मूर्खपणा करणार असशील तर मी ठेऊ का फोन?” ती लटक्या रागाने म्हणाली.“फोन ठेवायचा विषयच नाही,रात्रभर फोन ठेवायचा नाहीये तू आज,बोलत रहायचंय” तिचा हा नेहमीचा अधिकारवाणीचा स्वर त्याला खूप प्रिय होता,कुठलीही आर्जवे नाही,नेहमी आवाजात हुकुमत आणि ह्याच तिच्या मनस्वी रूपाने त्याला प्रेमात पाडलं होतं.“अजिबात नाही, आज एका दिवसात खूप मानसिक चढ उतार झालेत,डोळे आपोआप मिटतायेत माझे” ती चटकन बोलून गेली.“ये वेडाबाई मग अगोदर सांगायचं ना,ओके ठीक आहे.झोप तू आता.आपण असंही उद्या भेटणार आहोत ना रात्री.” “उद्या कसं काय?मला यायला उशीर होईल वेद.”“होऊ दे,मी वाट बघेन.”“अजिबात नाही हा वेद,ऑफिसला उशीर होतो रे.”“ये यार अस नाही.”तो चिडक्या स्वरात म्हणाला.“वेद तुला ऐकावं लागेल आणि