मी : "मीच का?????? तो का नाही....??" हा प्रश्न किती तरी वेळा माझ्या डोक्यात पिंगा घालत होता.... ब्रेक अप नंतर रोज 'इसमे तेरा घाटा..... मेरा कुछ नहीं जाता' हे गाणं ऐकून मनाला सांगितलं होतं की, मला सोडून जाणं त्याला परवडणार नाही... पण, त्या ब्रेकअपला माझाच अहंकार नडला हे ही तितकंच खरं होतं..... पण, मग आता काय करावं....?? कारण, माफी मागून मी स्वतःची व्हॅल्यू कमी नाही करणार..... कधीच नाही..... मग काय बरे करावे.....?? याच विचारात होते आणि आठवले ते दिवस जेव्हा, तो आणि मी एक क्यूट कपल म्हणून कॉलेजमध्ये मिरवायचो..... कॉलेजच्या फर्स्टडेलाच सगळ्यांची रॅगिंग करणारा तो ह्या इगोइस्टीक मुलीच्या प्रेमात कधी