पहिले प्रेम नक्की फसत !

  • 8.3k
  • 1.6k

पहिल्या प्रेमाची अनुभूती आपल्यातील प्रत्येकानेच घेतलेली आहे. या प्रेमाची आठवण विसरता विसरत नाही. आपण आयुष्यात पुढे जातो पण या आठवणी आपल्या कायम सोबत असतात. असे फारच थोडे नशिबवान असतात ज्यांना हे प्रेम लाभतं. जगात दुर्दैवी लोकांचीच संख्या जास्त आहे. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आमचा मित्र राहुल (नाव बदलेलं)! काल मला भेटायला आल्यावर प्रेमाचा विषय निघाला आणि त्याची लव्हस्टोरी डोळ्यांसमोरून गेली. आम्ही बारावीला असतानाची गोष्ट आहे. वर्गामध्ये राहुल माझ्या बाजूला बसायचा. पहिल्या दिवसापासून तो माझ्या बाजूला बसत होता आणि चांगला मित्रही झाला होता. एकदम मनमोकळा स्वभावाचा. नेहमी हसरा चेहरा.घरची परिस्थिती पण चांगली होती. पहिल्या दिवसापासून तो माझा चांगला मित्र झाला.