अधांतर - ९

  • 6.4k
  • 2.6k

अधांतर-९ ममता का वरदान पाकर, क्यूँ सदा अभिशापित हूं मै। विस्तृत बनाके जीवन सबका, फिर भी क्यूँ सिमीत हूं मै। स्त्री ही पुरुषांइतकीच कणखर आणि सामर्थ्यवान असू शकते ही कल्पनाही आपल्या समाजात मान्य नाही...आणि जेंव्हा एखादी स्त्री ही कल्पना सत्यात उतरवण्यात यशस्वी होते तेंव्हा समाजव्यवस्थेला तो धोका वाटायला लागतो, पुरुषप्रधान संस्कृती लोप पावेल ह्या भीतीने लोकं मग त्या स्त्रीचं कर्तृत्व हे तिचं पराक्रम नसून तीच चरित्रहनन आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जातात...वारंवार स्त्री आणि पुरुषांची तुलना केली जाते, या तुलनेत पुरुषांची बाजू किती वजनदार आहे याचा युक्तिवाद सुरू होतो....पण स्त्री आणि पुरुष यांची तुलनाच होऊ शकत नाही ही साधी