अधांतर-१० हसरतो के धागो मे हर क्षण, व्यथा का कण कण पिरोया करे। शिव-शक्ती मे विभेद जहाँ, वहां मेरा मनुहार कौन करे? जस कळायला लागलं तेंव्हापासून 'मुलीच्या जातीने हे करू नये, ते करू नये, असं वागावं, तसं वागू नये' याच सूचना ऐकायला मिळाल्या...ठीक आहे, मुलींना वळण लावण्यासाठी या गोष्टी ही गरजेच्या आहेत, चांगले संस्कार घडावे त्यासाठी थोडा दबावही गरजेचा आहे, मुलींवरही आणि मुलांवरही...! पण आज पर्यंत मला एक गोष्ट कळली नाही की ही 'मुलीची जात' नेमकी असते काय? नाही म्हणजे, मुलांना आणि मुलींना तर देवाने (कदाचित देवीनेही) सारखंच बनवलं आहे ना! त्यांची मनं, त्यांची बुद्धी ही सारखीच असावी, कारण दोघेही