कळतं पण वळत नाही!

  • 9.2k
  • 1
  • 2.3k

एखादी वस्तू, व्यक्ती आकर्षक असली की, सगळेच तिकडे खेचले जातात.... पण, जर ती आकर्षकच नसली की, तिच्या बाबतीत जे घडतं.... असच काहीसं या कथेतील नायिका असलेल्या, माझ्या बाबतीत घडलं किंबहुना, अजूनही घडतच आहे..... दुर्दैव हे की, मी अजुनही त्याच गोंधळात फसले आहे.... त्यातून बाहेर निघायचं हे कळतंय मला पण, वळत नाहीये.... तर तुम्हाला घेऊन चलते मागे जिथून माझं जग सुरू झालं...... मी एका प्रतिगामी विचारांच्या समाजात जन्मले म्हणण्यापेक्षा, समाज अजूनही त्याच विचारांनी गुरफटलेला आहे..... जिथे मुलगी म्हणजे फक्त परकं धन आहेत..... लहानाच्या मोठ्या झाल्या की, त्यांच्यासाठी स्थळ शोधून त्यांना "लग्न" या शीर्षकाखाली विकून टाकायचं..... हे मी इथे जाणीवपूर्वक म्हणेल कारण,