तू ही रे माझा मितवा - 14

(13)
  • 11.3k
  • 3
  • 5.6k

#तू_ही_रे_माझा_मितवा...#भाग_१४“#कबीर?” तिने गोंधळून विचारलं आणि झटक्यात पेपर स्प्रे काढला आणि दुसऱ्या हाताने घाईगडबडीत मोबाईल स्वीचऑन केला.“Hey Chill..!! Come on..! Wait..! Listen..!!” तो अगदी शांतपणे तिला समजवायचा प्रयत्न करत म्हणाला आणि तिच्या हातातील पेपर स्प्रे बघत त्याने सावध पवित्रा घेतला.तसा तो अजिबात घाबरला नव्हता,त्याला त्या परिस्थितीत तिने घेतलेल्या ह्या सावधानतेचं कौतुकच वाटलं. आत्ता समुद्रातून सचैल न्हाऊन एखादी सुंदर जलपरी समोर उभी आहे असा त्याला भास झाला,दृष्ट लागण्यासारखी ती सुंदर दिसत होती. “तिथेच थांब...पुढे येऊ नको हा” तिने त्याच्या दिशेने तो स्प्रे पकडला. ती सावध होती पण त्याच्या वागण्यात तिला एक आश्वासकपणा ही जाणवत होता.“अरे...कमाल आहे, ऐक तर...! see my card at least..”त्याने वालेटमधून