तू ही रे माझा मितवा - 15

  • 11.1k
  • 5.6k

#तू_ही_रे_माझा_मितवा...#भाग_१५झपझप पावलं टाकत ऋतू रेवाच्या रूमकडे निघाली,निरव शांततेत पावलांची चाहूल लागून रेवा सावरली,बेडवर वेदच्या शेजारी बसत त्याला तिने फक्त पलीकडच्या कुशीवर वळवण्याचा प्रयत्न केला. ऋतुजा आत आली तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी होत होती. ऋतुजाला पाहून तिने उगाच तिच्या स्पेगटीचा बेल्ट ठीक केला. ऋतू तिच्यासमोर उभी होती,तिच्या नजरेत प्रचंड राग होता.रेवाने ऋतूकडे बघितलं,एक स्त्रीसुलभ असूया तिला तिच्या रुपाकडे बघून वाटली.‘वेद भानावर असता आणि यांचं असं खाजगीत भेटणं झालं असतं तर वेदची नजर क्षणभरही हिच्यावरून ढळली नसती..कदाचित त्याचा स्वतःवर ताबा ही राहिला नसता..ही इतकी सुंदर दिसतेय’ तिच्या मनात काट्यासारख्या खुपणाऱ्या ह्या विचारला तिने लागलीच दूर केलं.“रेवा...तू मूर्ख तर आहेसच पण तुझा आणि त्या जोकर साक्षातचा नीचपणा