साधारण सहा महिने झाले असतील.... आमचं बोलणं बंद होऊन..... विसरला असेल कदाचित.... काहीही असो पण, त्याच्या सोबत होते तेव्हा, मला वेगळीच सुरक्षितता वाटायची.... त्याचं ते पब्लिक प्लेसमध्ये, स्वतःला माझ्या पासून दूर सारण.... मनाला खात्री देऊन जायचं की, हा एकमेव असा पुरुष आहे जो माझा आदर करतो..... कधीच मनाविरुद्ध त्याने चुकीचं केलं नसल्याने, माझं स्व: त्याला सोपवताना मी मन मोकळं केलं होतं..... मनात, ना कुठलं टेन्शन होतं ना कुठला नकारात्मक भाव.... बिनधास्त होते..... त्याचं असणं मला तेव्हा मूलभूत गरजांपैकी एक वाटू लागलं होतं..... सगळं व्यवस्थित सुरू असताना जाणवलं की, समोर आमचं भविष्य नाही मग एकमेकांत बुडून जीव जाण्यापेक्षा सावरलेलं बरं..... म्हणून,