अस्तित्वाची झुंज..

  • 7.7k
  • 2.5k

वय, साधारण परिस्थिती समजण्या योग्य झाले आणि मनात अस्तित्वाच्या आगीचा भडका उडाला... काय बरे करावे की, हा समाज आपल्याला इतरांप्रमाणे मान्यता देईल..?? या आणि अशाच कित्येक प्रश्नांनी डोकं भारावून जायचं... कालांतराने समजू लागले की, आता इथून पुढे अशाच प्रश्नांच्या सोबतीने, संघर्ष करत जीवनाचा हा प्रवास हसत - खेळत जगूया... कुठेही तक्रार न करता, आपल्या परीने प्रयत्न करत, जे मिळेल त्यात समाधान मानायचे... म्हणून, सुरुवात झाली संघर्षमय जगण्याला... घरची मंडळी समाजाच्या विचारांनी चालणारी त्यामुळे वेगळे विचार ठेऊन, मला त्रास होणार हे नक्की! पण, तरीही मी माझे विचार जपणार या आत्मविश्वासाने सुरुवात केली... सुरुवात करता क्षणीच मला समाज विघातक विचारांना बळी पडावे