आई भाड्याने देणे आहे

  • 8.1k
  • 2.6k

* आई भाड्याने देणे आहे !* सुनिता न्युज पेपर च्या ऑफिस मधे जाहीरात विभागात काम करीत होती.नेहमीप्रमाने आज देखिल ती आलेल्या जाहीरातीची व्यवस्थीत मांडणी करून ती प्रिंटीग ला पाठवण्यात बिझी होती.. अचानक तिच्या टेबलजवळ साठ वर्षाच्या वयस्कर बाई येऊन उभ्या राहील्या.सुनिताचे लक्ष गेले तिने बसायला चेअर दिली.त्या थकल्या सारख्या व हताश दिसत होत्या त्याना धाप पण लागली होती. तिने लगेच त्यांना पाणी दिले .थोड थांबुन त्या बोलल्या मला जाहीरात द्यायची आहे..सुनिताने विचारले कशासंदर्भात आहे.तुम्ही सांगा मी पहिल्यांदा कच्च लिहून घेते.व मग आपण फेअर करुया.त्या थोड्यावेळ घुटमळल्या..मग कसातरी आवंढा गिळत त्या म्हणाल्या ..आई भाड्याने देणे आहे ! सुनिताचा हात थबकला तिचा