शेवटचा क्षण - भाग 25

(11)
  • 8.1k
  • 1
  • 3.9k

गार्गीच्या मित्रांच्या ग्रुप मधल्या 2-3 मुलामुलींचे पण लग्न झालेत.. पण गार्गीने मात्र त्यांच्या लग्नाला जायचं टाळलं होतं.. कदाचित तिला भीती होती की लग्नात प्रतिकचा सामना झाला आणि मी पुन्हा विचलित झाली तर गौरव पुन्हा गैरसमज करून घेईल.. किंवा उगाच शंका घेईल म्हणून ... आता पुढचं लग्न अमितच होतं..आज सकाळी सकाळीच अमितचा गार्गीला फोन आला..गार्गी - हॅलो, गुड मॉर्निंग अम्या.. आज सकाळी सकाळी फोन??अमित - हो मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तुझ्याकडून एक प्रॉमिस हवं आहे, बोल देशील??तो उगाच सिरीयस होऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता .गार्गी - काय झालं अमित?? सगळं ठीक आहे ना?? तुला माझ्याकडून कसलं प्रॉमिस पाहिजे