शेवटचा क्षण - भाग 28

  • 9k
  • 4k

गार्गीच्या बोलण्यावर गौरवने रात्री झोपताना विचार केला.. त्याने गेल्या काही दिवसांत सोबत घालवलेले क्षण आठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला काही आठवतच नव्हतं.. "खरच आपल्या लक्षातच आलं नाही की आपण गार्गीपासून लांब होत चाललोय?? पण अस का होतंय?? मी तर आजही फक्त तिच्यावरच प्रेम करतो.. पण माझी परी आली आणि तो वेळ आता माझ्या परीला देतादेता परी च्या आईलाही माझी गरज असेल अस कधी जाणावलंच नाही.. आधी तर तिच्याशिवाय ना सकाळ व्हायची ना रात्र.. कधी तिला सांगितल्याशिवाय ऑफिसला पण जायचो नाही आणि आता ती सात महिने माझ्यापासून लांब राहिली तर माझी सवयच मोडली.. आज ती बोलली म्हणजे नक्कीच तिला कुठेतरी एकटेपणा