शेवटचा क्षण - भाग 28

  • 9k
  • 2
  • 3.9k

प्रतीक बसमध्ये बसला आणि त्याच विचारचक्र गाडीच्या चाकांसोबतच फिरू लागलं.." काय करत होतो मी आज.. काय विचार करून गार्गीला भेटायला निघालो होतो.. कशीतरी सावरली असेल ती.. गौरवसोबत रमली असेल नि मी तिच्यापुढे येऊन आज पुन्हा तिला विचलित करणार होतो.. बरं झालं आधीच लक्षात आलं आणि लगेच परतलो.. स्वतःहून तिच्याशी दुरावा निर्माण केला, कधीच तिच्याशी नीट बोललो नाही, मनावर दगड ठेऊन तिला दुखावत राहिलो , कशासाठी?? तिने मला विसरून तिच्या संसारात मन रमवावं यासाठीच ना, आणि आज हे काय करणार होतो मी.. पण आता माझा साखरपुडा होणार आहे , गार्गीबद्दल मनात इतकं प्रेम आहे की ते विसरणं तर शक्य नाही पण पुढच्या