शेवटचा क्षण - भाग 30

  • 8.4k
  • 2
  • 3.8k

सकाळी गार्गी उठून एकदम आनंदाने घरात वावरत होती.. तिला वाटलं आज तिला गौरव गिफ्ट देणार आहे आणि तो कुठल्या अंदाजाने देतोय हे तिला बघायचं होतं.. पण त्याच्याकडे बघितलं असता त्याच तस काहीच त्याच्या वागणुकीवरून वाटत नव्हतं.. अगदी रोजच्या सारख त्याच रुटीन सुरू होतं.. गार्गीने काल बॅग उघडून बघितलेच त्याला माहितीच नव्हतं.. तो योग्य वेळेची वाट बघत होता खरंतर सगळ्यांसमोर ते गिफ्ट त्याला गार्गीला द्यायचं नव्हतं, त्याने आज थोडा वेगळा विचार केला होता.. गार्गीने दिवसभर वाट बघितली रात्रीही झोपायला जाईपर्यंत ती वाट बघत होती.. पण गौरव मात्र अजूनही तसाच त्याने गिफ्ट दिलं पण नाही आणि काही बोलला पण नाही.. म्हणून नाराज