शेवटचा क्षण - भाग 32

  • 7.4k
  • 3.3k

ती विचार करत तिथेच हॉस्पिटलमधल्या एक बाकड्यावर बसली.." आता काय करू?? घरी तर सगळं आई सांभाळून घेतील पण मी ऍडमिट असताना इथे कोणाला थांबावं लागेल कुणाला सांगू?? गौरवला सांगितलं तर तो तिकडे एकटा आहे. आणि त्याच मन फार हळवं आणि कमजोर आहे.. अस काही मी जर फोन वर सांगितलं आणि त्याने तिकडे टेन्शन घेऊन आजारपण ओढवून घेतलं तर.. नको नको, मी त्याला फोनवर नाही सांगणार काहीच.. फक्त लवकर ये म्हणून सांगते, पण काय झालं असं अचानक विनाकारण मी का बोलवतेय?? अस साहजिक प्रश्न विचारेल तो..तेव्हा मी काय सांगणार?? आणि साधं खूप आठवण येत आहे म्हणून तू सगळं सोडून ये सांगितलं