शेवटचा क्षण - भाग 35

(14)
  • 8.6k
  • 3.7k

गार्गीला दुसऱ्या खोलीत आणलं , खोली खूप छान हवेशीर आणि भरपूर नैसर्गिक उजेड येईल अशी होती.. त्याला दोन खिडक्या आणि ऐसपैस खोली होती.. तिला खोलीत पोचवल्यावर नर्स ने तिला विचारलं की "खोली आवडली का ताई आता?" पण तीच कुठे लक्ष होतं ती केव्हाच त्या स्पर्शाच्या विचारांत गुंतली होती.. "कोण असेल ती व्यक्ती तो स्पर्श मला एवढ्या जवळचा का वाटत होता?? अस वाटत होतं की मी त्या स्पर्शाला खूप चांगलं ओळखते.. तो गौरव तर नव्हता ना?? नाही नाही काहीही काय विचार करते गार्गी, जर चांगला विचार कर... अस नसेल , उगाच तू तुझ्या संभ्रमात आहे किंवा गौरव आला नाही म्हणून