तू ही रे माझा मितवा - 20

(11)
  • 11.2k
  • 5.3k

#तू_ही_रे_माझा_मितवा#भाग_२०औंधच्या एका टुमदार बंगल्यासमोर गाडी थांबली.कबीरच्या गाडीचा आवाज ऐकून वॉचमनने गेट उघडलं.त्याने गाडी आत लावली.डीक्कीतून bag काढली आणि ऋतुजाने मागे केलेलं सीट व्यवस्थित लावत असतांना त्याचं लक्ष खाली legmatवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं.ऋतुजाचं अँकलेट होतं.त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल पसरलं त्याने ते खिशात टाकलं आणि तो पुढे जाणार तोच वॉचमन म्हणाला –“कबीर भाऊ ही bag खाली पडली होती.” त्याच्या हातात एक हार्टशेप छोटी गुलाबी bag होती. “ माझीच आहे.” त्याने ती ओढून घेतली. त्या गुलाबी bagकडे पाहून वॉचमनने पुन्हा कबीरकडे पाहिलं. अपेक्षेप्रमाणे आई बाबा झोपले होते,कबीर तडक रुममध्ये गेला. शॉवर घेऊन बेडवर पडेपर्यंत त्या क्षणाची हजारवर आवर्तनं त्याच्या मनात चालू होती आणि स्वतःचा रागही येत