दोन दिवसांपासून एक माणूस अजयचा पाठलाग करत होता. त्याच्यावर पाळत ठेवत होता. पहिल्या दिवशी अजयच्या एवढं लक्षात आलं नाही. पण दुसऱ्या दिवशी त्याला ते चांगलंच जाणवलं. तो जेथे जाईन तेथे तो माणूस त्याच्या मागे जायचा. त्याने त्या माणसाकडे पाहिले तर तो माणूस दुसरीकडे पाहायचा. तो माणूस कोणत्या कारणासाठी त्याचा पाठलाग करत असेल याचाच अजय विचार करत होता. एक तर तो माणूस दिसायला भयंकर दिसत होता. साधारणत: सहा फुट उंची, धिप्पाड शरीर, लाल डोळे, रुबाबदार मिशा, डांबरासाराखच काळा रंग त्याला बघीतलं की, त्याची भिती वाटावी असा तो माणूस होता. काल रात्री तर तो अजयच्या