अधांतर - १६

  • 5.8k
  • 2.4k

अहंम की छत गिरने का, शोर नही हो पाता है । शोहरत का आसमाँ तो, बस एक वहम होता है । मला असं वाटतं यश मिळवणं फार सोप्प आहे पण ते टिकवणं म्हणजे ब्रह्मव्रत...!! असं का?? तर, मला वाटतं यश म्हणजे भ्रमाचा भोपळा...ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटला त्यादिवशी हे यश आणि त्याचा अभिमान किती अर्थहीन आहे याची जाणीव होते... त्यामुळे ज्याच्या जवळ विवेक आहे त्यालाच यश हाताळता येतं असं मला वाटतं...विक्रमने जितक्या लवकर सगळं काही मिळवलं तितक्या लवकर त्याने सगळं गमावलं ही !!...त्याला चांगल्या वाईट मधला फरक कळलाच नाही किंवा मी असं बोलेन की ते समजून घेण्याची विवेकबुद्धी नव्हतीच