अभागी ...भाग 11

  • 10.5k
  • 4k

मधुरा ने तर कविता म्हटली सर्वांना आवडली ही पणं विराज चा मात्र हा ही प्लॅन फेल झाला..उलट जेव्हा विराज ची वेळ आली तेव्हा सर्वांनी त्याला डान्स करायला सांगितलं...बिचारा विराज ..डान्स येत नसल्या मुळे ..सर्वांच्या हसण्याच कारण बनला....मधू आता साया सोबत बोलू लागली होती थोडी थोडी का होईना..आणि तिने मधुर ला ही मधू म्हणायची परवानगी दिली होती. कॉलेज सुरू असताना आज मधू ला लेक्चर मध्येच आई चे खूप फोन येऊन गेले..आई कॉलेज वेळात का फोन करते हे तिला कळेना..तिने लेक्चर संपला तसा बाहेर जाऊन आई ला फोन लावला तर ..तिच्या बाबांचा अॅक्सीडनट झाला आहे व ते हॉस्पिटल मध्ये आहेत अस तिला