सहवास भाग - 5

  • 16.8k
  • 8.4k

शब्द ने जाताना शिराज ला बोलावलं .. तिची कंप्लेंट होती कि तिचे डिझाईन का पास नाही झाले .. तो तिच्याशी बोलत होता तेवढ्यात त्याला फोन आला .. शिराज .. मला काही कामासाठी लवकर जायचंय .. तुझी ना नसेल तर आपण कार मध्ये बोलू .. सर चालेल .. ठीक आहे चल .. कार मध्ये जाताना ते सीझनल डिझाईन वर बोलत राहिले शिराज ला शब्द च्या बाजूला त्याच्या लक्झरी कार मध्ये बसताना खूप मोठं झाल्यासारखं वाटत होतं कारण ती आताच कॉलेज पास करून जॉब ला लागली होती .. २०-२१ वयातला होता .. त्यातच आपल्याला खूप समोर जायचंय आणि त्यासाठी काही पण करायला ती तयार होती .. कामासाठी