तू ही रे माझा मितवा - 27

(25)
  • 14.3k
  • 6k

#तू_ही_रे_माझा_मितवा... #भाग_27{This is a work of fiction. Names, characters, businesses, places, events, locales, and incidents are either the products of the author’s imagination or used in a fictitious manner. Any resemblance to actual persons, living or dead, or actual events is purely coincidental.} नवीन कामाचा पहिला दिवस!आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा काहीतरी हटके काम करायची नवी उमेद तिच्यात जागत होती.तिला आवडणारा सॉलिड टीलकलरचा फॉर्मल पेन्सिल वनपीस तिला खुलून दिसत तर होताच पण चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वाससुद्धा तिच्या अटायरचाच भाग झाला होता. दाट केसांची ट्विसटेड पोनीटेल आणि जरासा मेकअप आणि डोळ्यातलं काजळ.आरश्यात स्वतःला पाहून तिने आनंदात डोळे मिचकावले