हरवलेलं प्रेम

  • 5.1k
  • 1.7k

यंदा पाऊस वेळेवर पडला होता. गेल्या सहा-सात महिन्यांपासून पारुशा असणाऱ्या झाडांना पावसानं अंघोळ घातली होती. त्यामुळे झाडं टवटवीत, ताजेतवाने दिसत होते.पाखरं मंजुळ आवाज करत इकडून-तिकडे बागडत होते. शेतकरी, कष्टकरी आनंदून गेले होते. ते लगबगीनं पेरणीच्या कामाला लागले होते. सगळं शिवार माणसांनी फुलुन गेलं होतं. एरव्ही माणसांनी फुलून गेलेली चावडी पोरक्यासारखी भासत होती. सचीनच्या रानात पण कापूस लावण्याचं काम जोरानं सुरु होतं. एकलगट असणाऱ्या पंधरा एकरात सचीनच्या आबानं कापूस लावायचा ठरवलं होतं. कापूस लावायला रोजंदारीवर बाया लावल्या होत्या. सचीनची आई त्या बायांबरोबरच सकाळी रानात जायची. एकेदिवशी सकाळी सचिन जेवायला बसला तेव्हा त्याची आई त्याला खवळत होती. “आता मोठा झालास,